म्हसवड (अशोक मुरुमकर) : माढा मतदारसंघात ‘तुतारी’वर लढणारा आम्हाला उमेदवार हवा आहे. तो कोणीही असला तरी चालेल त्याला आम्ही विजयी करू, असे विधान अभयसिंग जगताप यांनी केले आहे.

म्हसवड येथे आज महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा झाला. प्रास्ताविक माजी सरपंच विजय जगताप यांनी केले. माढा मतदारसंघात जगताप हे महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र काही दिवसांपासून मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यात जगताप यांनी केलेले विधान महत्वाचे असून मोहिते पाटील यांच्या प्रवेशाला त्यांनी हा ग्रीन सिग्नल दिले असल्याचे मानले जात आहे.

अभयसिंग जगताप म्हणाले, ‘महादेव जानकर यांनी महायुतीचा मार्ग स्विकारला. मात्र मी सुरुवातीपासूनच उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहे. आता आणखी दुसरे एक नाव चर्चेत आले आहे. ऐनवेळी काही लोक पक्षातील येतील आणि शक्तीप्रदर्शन करतील आणि उमेदवारी मागतील. मात्र आमची त्याला काहीच हारकत नाही, आम्हाला फक्त तुतारीवर लढणारा उमेदवार हवा आहे, त्याला आम्ही विजयी करु, असे त्यांनी सांगितले आहे.

आमदार शशिकांत शिंदे, दिलीप तुपे, सेवानिवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, महेश माने, राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, सुनिल सावंत, प्रतिभा शिंदे, विशाल जाधव, निवृत्ती खताळ, अमोल पवार आदी उपस्थित होते.

जगताप म्हणाले, खासदार निंबाळकर हे नागरिकांना भेटले नाहीत. माढा लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने अभयसिंग जगताप यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी भाजपवर टीका केली. माढ्यातील मावळा ग्रुपच्या भाग्यश्री पाटील यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. माळशिरसमधील संजय देवगुंडे, यांनी महागाईवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्र सोडले. म्हसवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक विलास माने यांनी मनोगत व्यक्त करत अभयसिंग जगताप यांना उमेदवारीची मागणी केली. महादेव म्हासाळ, म्हणाले माढ्यात फक्त तुतारी वाजली पाहिजे. प्रतिभा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले आहे.

‘भाजपने यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देऊन चुक केली आहे. आम्ही त्यांना यापूर्वी विजयी केले ही तेव्हा चुक केली आता आम्ही तशी चुक करणार नाही, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आम्ही आता विजयी करणार, असल्याचे प्रतिपादन वडुजचे माजी नगराध्यक्ष महेश गुरव यांनी केले. मराठा आरक्षणासाठी छत्रपती उदयनराजे यांनी सर्व खासदारांचे केंद्रात निवेदन दिले. मात्र त्या निवेदनावर निंबाळकरांनी सही केली नाही, याचा निषेध करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
(कार्यक्रम सुरु आहे)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *