करमाळा तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. रवींद्र पुंडे यांची निवड

Selection of Dr Ravindra Punde as Karmala Taluka Health Officer

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका आरोग्य अधिकारीपदी डॉ. रवींद्र पुंडे यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल डॉ. सादिक बागवान, डॉ. यशवंत व्हरे, डॉ रविकिरण पवार, डॉ. लावंड व डॉ. समीर बागवान यांनी सत्कार केला आहे. करमाळा तालुक्यातील आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. सर्वसामान्य रुग्णांना करमाळा तालुक्यातील सर्व डॉक्टरांनी चांगल्याप्रकारे सेवा द्यावी, काही अडचणी असतील तर समनव्य ठेऊन त्याची सोडवणूक केली जाईल असे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *