Doctor Vishwanath Karad launch of MIT World Peace University Nisargavedha adventureDoctor Vishwanath Karad launch of MIT World Peace University Nisargavedha adventure

पुणे : एमआयटी डब्ल्यूपीयू (MIT- WPU) आणि गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशन (GAF) यांच्या वतीने MIT-WPU ॲडव्हेंचर क्लब ची स्थापना १२ जानेवारीला करण्यात आली होती. या ॲडव्हेंचर क्लबच्या निसर्गवेध या साहसी उपक्रमाअंतर्गत २०२३- २४ या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाच्या
पदवीधर व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सह्याद्रीतील गड किल्ल्यांवर ट्रेकिंग करिता नेण्यात येणार आहे. या उपक्रमाचे नियोजन गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशन करीत असून या वर्षीच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे पहिले तीन ट्रेक मंगळवारी अनुक्रमे राजगड, तोरणा व रोहिडा या किल्ल्यांवर पार पडले.

या तीन किल्ल्यांवरील ट्रेक करिता एकूण २१२ विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला होता. विद्यापीठातील सर्व विद्यार्थी या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. या आगळ्या वेगळ्या उपक्रमाला सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी मोठ्या उत्साहात सुरुवात केली. MIT- WPU नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२३ चे अनुसरण करत आहे जे बाह्य व साहसी शिक्षणावर भर देते. या उपक्रमांतर्गत विद्यापीठामार्फत प्रथम वर्षाच्या सुमारे नऊ हजार विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

इतक्या मोठ्या स्तरावर विद्यार्थ्यांसाठी गिर्यारोहण या साहसी खेळाची सुरुवात करणारी MIT- WPU ही पहिली युनिव्हर्सिटी ठरली आहे. MIT- WPU चे कार्यकारी अध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या ॲडव्हेंचर क्लबचे मुख्य उद्दीष्ट हे सर्व विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्री व शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दुर्गवैभवांची माहिती जाणून घ्यावी हे आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांमध्ये ट्रेकिंगच्या माध्यमातून साहसी वृत्ती निर्माण व्हावी व यातून त्यांनी स्फूर्ती घेऊन भविष्यात यशस्वी वाटचाल करावी.

निसर्गवेध उपक्रमाच्या पहिल्या ट्रेक्सच्या सुरुवातीला MIT-WPU चे डॉ. समर्थ पटवर्धन, गिरिप्रेमी संस्थेचे अष्ठहजारी मोहिमांचे नेते व शिवछत्रपती पुरस्कार पुरस्कृत श्री. उमेश झिरपे, एव्हरेस्ट शिखरवीर, भुषण हर्षे, गिरिप्रेमी ॲडव्हेंचर फाऊंडेशनचे संचालक सचिन गाडगीळ व चंदन चव्हाण, विद्यापीठ समन्वयक व ॲडव्हेंचर क्लबच्या कार्यवाहक रश्मी वारके, डॉ. ऑल्विन व इतर शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *