करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील पाच गावांची ‘मिशन महाग्राम’साठी निवड झाली आहे. यामध्ये सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची अमंलबजावणी करण्यासाठी ब्लॉक मॅनेजर म्हणून जयपाल कांबळे म्हणून कामकाज पाहत आहेत. राज्यात १०० गावांची यासाठी निवड झाली आहे. त्यात करमाळ्यातील घोटी, वरकुटे, अळसुंदे, पाथुर्डी व नेर्ले या गावांचा समावेश आहे.
मिशन महाग्रामसाठी सीएम कार्यालयात वॊर रूम आहे. जिल्ह्यास्तरीय समितीत जिल्हाधिकारी व तालुकास्तरीय समितीत गटविकास अधिकारी म्हणून प्रमुख आहेत. तालुक्यात कांबळे यांच्या नियुक्तीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी पत्र दिले आहे. मिशन महाग्राममध्ये गावामध्ये शिक्षण, आरोग्य, ग्रामीण गृहनिर्माण, कृषी व इतर शेतीपूरक व्यवसाय, पाणी पुरवठा व स्वच्छता, दुग्ध व्यवसाय यावर काम केले जाणार आहे.
गावाचा शाश्वत विकास करण्यासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती येथे दिली जाणार आहे. पाच गावांचा प्रमुख म्हणून सरपंच विलास राऊत हे काम पाहत आहेत. गावातील सरपंचाची यामध्ये भूमिका महत्वाची असणार आहे. भारतीय साधारण विमा, महाराष्ट्र सामाजिक परिवर्तन अभियान व टाटा ट्रस्टच्या माध्यमातून हे काम केले जाणार आहे.