करमाळा (सोलापूर) : पत्रकार तुषार खरात यांच्या अटकेचा करमाळ्यातील पत्रकारांनी आज (बुधवारी) प्रशासनाला निवेदन देत निषेध केला. यावेळी आईच्या निधनाच्या दुःखात असतानाही ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर हे उपस्थित राहून पत्रकारांच्या पाठीशी उभा राहिले. खरात यांच्या अटकेचा निषेध करत पत्रकरांची ही गळचेपी असल्याची भावना व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले, सुनील भोसले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करत या घटनेचा निषेध केला.
पत्रकार तुषार खरात यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली असून त्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. अशी भावना पत्रकारांची आहे. यामध्ये पत्रकरांच्या स्वातंत्र्यावर गदा आली असल्याचे सांगण्यात आले. पत्रकारांच्या स्वातंत्र्याची ही गळचेपी असून याचा निषेध करत निवेदन देण्यात आले. यावेळी करमाळ्यातील प्रमुख दैनिक, युट्यूब व वेब पोर्टलचे प्रतिनिधी उपस्थित होते. काही सहकार्यांना नियोजित कामामुळे उपस्थित राहता आले आंही. परंतु त्यांच्याही भावना तीव्र आहेत.
ज्येष्ठ पत्रकार कबीर यांच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. मात्र खरात यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी पत्रकार निवेदन देणार आहेत. याची माहिती मिळाल्याबरोबर ठरलेल्या वेळेत ते तहसील कार्यालय परिसरात आले होते. याबाबत त्यांनी पत्रकारांना बातमी लिहिताना काय काळजी घ्यावी? याबाबतही मार्गदर्शन केले. पत्रकरांच्या स्वातंत्र्यावर कशी गळचेपी केली जात आहे यावरही ते बोलले.