करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना नदी पुरगस्त नागरिकांना सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांतच्या वतीने खुर्च्या व चारजेबल दिवे वाटप करण्यात आले. पुणे येथील उद्योजकांनीही यामध्ये मदत दिली होती. करमाळा तहसील कार्यालय येथे हे वाटप झाले. यावेळी साधणार ११० नागरिकांचे वाटप झाले. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या उपस्थित हे वाटप झाले.
करमाळा तालुक्यात बिटरगाव श्री, निलज, बोरगाव, आळजापूर, तरटगाव, खडकी या गावांत नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. येथील पूरग्रस्त गावकऱ्यांना मदत करण्यासाठी पुण्यातील उद्योजकांनी पुढाकार घेतला होता. यात सेवा भरती पश्चिम महाराष्ट्र प्रांतची महत्वाची भूमिका होती. करमाळा येथील खुर्चिव दिवे वाटपावेळी सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सामाजिक आयाम व आपत्ती व्यवस्थापन प्रमुख सदानंद कुलकर्णी, सेवा भारतीच्या पुणे येथील राधिका बुचके, वैशाली वैद्य, प्रमोद फंड, राजन गांधी, भाजपचे किरण बोकण, भाजपचे दीपक चव्हाण, आदर्श शिक्षक संतोष पोतदार व प्रभारी केंद्रप्रमुख निशांत खारगे आदी यावेळी उपस्थित होते.
सीना नदीला यावर्षी पहिल्यांदाच सलग तीन महापूर आले होते. त्यामुळे या भागातील शेतकरी व अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या मदतीला सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत धावला आहे. पूरग्रस्त बाधित नागरिकांना त्यांनी खुर्ची व दिवे दिले आहेत. त्यांनी यापूर्वी किराणा किटही दिले होते.
