करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या भावना जाणुन घेण्याच्या निमित्ताने जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या शितलादेवी मोहिते पाटील यांनी संगोबा येथे श्री आदिनाथ महाराज मंदिराला भेट देवुन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मोहिते पाटील यांचे स्वागत नरुटे परिवारातील प्रियंका नरुटे, सोजर नरुटे तसेच संगोबा येथील पुजारी गायकवाड, लता भालेराव, पल्लवी सुपनवर यांचे हस्ते झाले.
मोहिते पाटील समर्थक डाॅ. अमोल घाडगे, अमरजित साळुंखे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर, बोरगावचे संजय शिंदे पाटील, सुशिल नरुटे, धनाजी नरुटे, पुजारी जालिंदर गायकवाड, गोरख हाके, आण्णा नरुटे, उमेश सरडे करंजेचे उपरपंच सरडे, पवार, दत्तात्रय सुपनवर, गहिनीनाथ भालेराव, अरुण भालेराव उपस्थित होते.
सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील हे आदिनाथ कारखान्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी विनायकराव घाडगे यांच्याकडे तरटगावला यायचे तेव्हा संगोबा बंधारा नव्हता. त्यावेळी सीना नदीला कंबरेभर पाणी वाहत असताना ते पार करण्यासाठी सहकार महर्षींना मुरलीधर विठोबा नरुटे हे खांद्यावर घेऊन जायचे तेही उपस्थित होते. या भागातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. शितलदेवी धैर्यशील मोहिते पाटील यांनी परिसरातील अनेक अडीच अडचणी जाणून घेतल्या व पुढील काही दिवसात योग्य निर्णय घेतला जाईल, असा आशावाद बोलून दाखवला.