करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टरोबर दरम्यान ‘महसूल सेवा पंधरवडा’ साजरा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बिटरगाव (श्री) येथे आज (शनिवारी) गावातील शिव, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाय मार्ग, शेतावर जाण्याचे मार्ग याची ग्राम महसुलधिकारी, पोलिस पाटील, सरपंच, कोतवाल यांनी पहाणी केली.
तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पहाणी करण्यात आली. यामध्ये अडथळा असलेल्या रस्त्यांबाबत बुधवारी (ता. १७) होणाऱ्या विशेष ग्रामसभेत चर्चा करून मार्ग काढले जाणार आहेत. सकाळी ९ वाजता ही पहाणी करण्यात आली. यावेळी ग्राममहसूल अधिकारी श्री मुरकुटे, पोलिस पाटील शोभा अभिमन्यू, माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर, दौलत वाघमोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब मुरूमकर, संजय जाधव, अनिल गवळी, भगवान खराडे, भूषण अभिमन्यू, दादा गवळी आदी उपस्थित होते.