करमाळा (सोलापूर) : करमाळा शिवसेना शहर प्रमुख पदी नागेश गुरव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचेपत्र शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य माजी आमदार कृष्णा भेगडे व सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख प्रा. शिवाजीराव सावंत यांनी दिले आहे.
गुरव हे माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, ऍड. शिवाजीराव मांगले यांच्यासोबत त्यांनी करमाळ्यात शिवसेना मजबूत करण्याचे काम केले होते. सध्या ते करमाळा उपशहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत गुरव यांचा प्रा. सावंत व जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी सत्कार केला. यावेळी करमाळा विधानसभा शिवसेना अध्यक्ष राहुल कानगुडे, उप तालुकाप्रमुख दादा थोरात, उपतालुका प्रमुख नवनाथ गुंड, शिवसेनेच्या महिला जिल्हा उपप्रमुख ज्योती वाघमारे, पंढरपूर तालुका प्रमुख शिवाजी बाबर, उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते.