करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात शिवसेनेची (शिंदे गट) आज (मंगळवार) श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भवानी पेठेत प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदनीदेवी जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर यांच्यासह अनेक उमेदवार उपस्थित होते.
ढोल- ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या अतिशबाजीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या फेरीला सुरुवात झाली. उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या गळ्यातील शिवसेनेचे उपरणे व डोक्यावरील फेटा सर्वांचे लक्ष वेधत होता. दोन्ही बाजूंच्या दुकानदारांना भेटून यावेळी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. भवानी पेठ मार्गे, जय महाराष्ट्र चौक, मेन रोडने सुभाष चौकात ही फेरी आली. यावेळी शिवसेना व जगताप गटाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
