करमाळ्यात बागल व बार्शीत राऊत यांना शिवसेनेची उमेदवारी

Shivsena candidacy for Digvijay Bagal and Barshi Rajendra Raut in Karmala Assembly

सोलापूर (अशोक मुरूमकर) : करमाळा व बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची (शिंदे गट) उमेदवारी आज (सोमवारी) जाहीर झाली आहे. यामध्ये करमाळ्यात दिग्विजय बागल व बार्शीत राजेंद्र राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने १५ उमेदवारांची यादी आज जाहीर केली आहे. त्यामध्ये दोन जागा मित्र पक्षांना देण्यात आल्या आहेत.

सिंदखेडराजा शशिकांत खेडकर, घनसवांगी हिकमत उढाण, कन्नड संजना जाधव, कल्याण ग्रामीण राजेश मोरे, भांडुप पश्चिम अशोक पाटील, मुंबादेवी शायना एनसी, संगमनेर अमोल खताळ, श्रीरामपूर भाऊसाहेब कांबळे, नेवासा विठ्ठलराव पाटील, धाराशिव अजित पिंगळे,गुहागर राजेश बेंडल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

शिवसेना सहयोगी पक्षातील जनसुराज्य पक्षाला हातगणांगले मतदारसंघात अशोकराव माने व राजश्री शाहूविकास आघाडीला शिरोळ मतदारसंघ सुटला असून येथे राजेंद्र यांड्रावकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *