करमाळा (सोलापूर) : भाजप युवा मोर्चा करमाळा तालुकाध्यक्षपदी शुभम बंडगर यांची निवड झाली आहे. युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार राम सातपुते, भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, जिल्हा संघटक सरचिटणीस शशिकांत चव्हाण, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवराज पुकळे यांच्या हस्ते पत्र देऊन ही घोषणा झाली. या निवडीनंतर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी त्यांचे अभिनंदन केले.
शुभम बंडगर हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना प्रदेश कार्यकारणी सदस्य, जिल्हा संयोजक म्हणून काम केले. करमाळा बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर यांचे ते चिरंजीव आहेत.