करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे येथे भरदुपारी घराचा दरवाजा उघडून चोरट्याने प्रवेश करत २ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामध्ये दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात अमित लक्ष्मण मारकड यांनी फिर्याद दिली आहे. २९ तारखेला फिर्यादी मारकड हे दुपारी २ वाजताच्या सुमारास वडिलांना सोडवण्यासाठी जेऊर रेल्वे स्टेशन येथे गेले होते. तेव्हा त्यांच्या आई घरी होत्या. त्या घराच्या बाजूला जनावरांसाठी गिनीगोल काढत होत्या. त्यांनी ३ वाजताच्या सुमारास घरातून जाताना दोन व्यक्ती पाहिल्या त्यांनतर त्यांनी घरात पाहिले तर कपाटात ठेवलेले साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व दीड तोळ्याचे मिनी गंठण नसल्याचे दिसले. त्यांनंतर त्यांनी करमाळा पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.

