करमाळा (सोलापूर) : ‘आता नाही तर कधीच नाही, आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही… आता थांबायचे नाही..’, असे म्हणत करमाळा तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व बहुजन समाजाने साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाचा आज (शुक्रवार) दुसरा दिवस आहे. या आंदोलनाला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यातच श्रीदेवीचामाळ येथील गणेश पवार यांनी रक्ताने सही करुन आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
करमाळा येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणावा तालुक्यातील गावागावातुन पाठींबा मिळत आहे. आनेक ठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. आंदोलनाच्या ठिकाणी साखळी उपोषणात सहभाग नोंदवण्यासाठी गावांचे नंबर लागले आहेत. शांततामय स्वरुपात हे अंदोलन सुरु रहावे म्हणून रोज एक- दोन गावातील समाज बांधव उपोषणाला बसत आहेत. हजारो बांधवांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.