करमाळा (अशोक मुरुमकर) : महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत. ही संताची भूमी म्हणून ओळखली जाते त्यामुळे राज्याच्या सिमेवर ‘संताच्या भूमीत आपले स्वागत’ असा सरकारने फलक लावला पाहिजे अशी अपेक्षा किर्तन केसरी अक्रुर महाराज साखरे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उत्तराखंडचे उदाहरण दिले आहे.
जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भाजपचे गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमीत्त सरपंच डॉ. अभिजीत मुरुमकर यांच्या पुढाकारातुन बिटरगाव श्री येथे पाच दिवसाचा किर्तन महोत्सव आयोजित केला आहे. त्यातील आज (गुरुवारी) साखरे महाराज यांचे पहिले किर्तन झाले. साखरे महाराज यांनी मोबाईलचा अती वापर यावरही भाष्य केले.
शिक्षण घेत असलेल्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
‘कोणतेही चांगले काम करण्यासाठी नम्र व्हावे. चांगल्या कामात अडचणी येत असल्यातरी मार्ग बदलू नका’, असे सांगतानाच स्त्रीभ्रूण हत्या यावर त्यांनी किर्तनातून स्त्रोत्यांना कानमंत्र दिला.
साखरे महाराज यांनी किर्तनसेवा देताना पंढरपूर येथील सुविधांबाबत खंत व्यक्त करत चिवटे यांच्याकडून श्रीराम प्रतिष्ठाणकडून राबवल्या जात असलेल्या ‘विद्यार्थ्यांच्या जेवणाची’ व्यवस्था याचे कौतुक केले आहे.