आषाढी एकादशीनिमित्त देवळाली येथे भाविकांना फराळ वाटप

करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त भाजपचे गणेश चिवटे यांच्या हस्ते देवळाली येथे भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. छत्रपती प्रतिष्ठान व गणेश भाऊ चिवटे युवा मंच यांच्याकडून आषाढी एकादशीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला.

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथुन विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेऊन येणाऱ्या भाविकांना आषाढी एकादशी निमित्त गणेश भाऊ चिवटे युवा मंच व छत्रपती प्रतिष्ठान यांच्याकडून भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. यावेळी पंढरपूरहुन आलेल्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. भाजपचे तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहाजी पाटील, संदिपान कानगुडे, सतिषबापु कानगुडे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अमोल पवार, छत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भैय्याराज गोसावी, रमेश गायकवाड, नितीन कानगुडे, सचिन कानगुडे, जयंत काळे पाटील, भरत चोपडे, चेतन राखुंडे, लखन शिंदे, किरण गोसावी, राजु जगताप, तात्या जाधव, बापू जगताप उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *