करमाळा (सोलापूर) : आयुष्यात समाजकार्य महत्त्वाचे असून भाजपचे गणेश चिवटे यांनी राबलेला उपक्रमा उल्लेखनीय असल्याचे सांगत हभप संदीप महाराज खंडागळे यांनी बिटरगाव श्री येथील किर्तन महोत्सवात आज (शुक्रवारी) दुसर्या दिवसाची सेवा सादर केली.
बिटरगाव श्री येथे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भाजपचे गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित किर्तन महोत्सव सुरु आहे. संदीप खंडागळे महाराज म्हणाले, सध्य संस्कृतीवर भाष्य करत आई- वडीलांची सेवा हीच ईश्वरसेवा मानून जीवन जंगले पाहिजे. याबाबत बोलताना त्यांनी अनेक उदाहरणे दिली. किर्तनामध्ये श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारीत पवाडे सादर करत स्रोत्यांची मने जिंकली.