Solapur District Planning Committee will bring huge funds for Karmala Taluka: Ganesh ChivteSolapur District Planning Committee will bring huge funds for Karmala Taluka: Ganesh Chivte

करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यासाठी भरघोस निधी आणू, असे आश्वासन भाजपचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांनी दिले आहे.

गुळसडी येथे चिवटे यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा परिषदेच्या शाळेला संरक्षण भिंत बांधकामासाठी तीन लाख निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन झाले. चिवटे म्हणाले, सोलापूर जिल्हा नियोजन समितीमधून करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांसाठी तीन कोटी निधी मंजूर झाला आहे. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहे.

भाजप तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, गणेश महाडीक, विनोद महानवर, गुडसळीचे सरपंच प्रमोद भंडारे, माजी सरपंच समाधान यादव, उपसरपंच योगेश भंडारे, ग्रामपंचायत सदस्य महावीर कळसे, आदम शेख, नारायण भोसले, पोलिस पाटील धनंजय अडसूळ, माजी उपसरपंच नवनाथ यादव, माजी सरपंच अनंत यादव, माजी ग्रामपंचायत सदस्य तानाजी खंडागळे, बापू मोहोळकर, ग्रामपंचायत सदस्य मारुती जाधव, सामाजिक कार्यकर्ते सतीश बागल, श्याम पडवळे, पप्पू बागल, राज भंडारे शुभम लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *