करमाळा (सोलापूर) : धायखिंडी ते करंजे रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे यांच्या निधीतून निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे त्यांचा भाजप संपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. करंजेचे सरपंच काकासाहेब सरडे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
सरपंच सरडे म्हणाले, धायखिंडी करंजे रस्ता खराब झाला होता. हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून या भागातील नागरिकांची मागणी होती. चिवटे यांनी सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत 75 लाख निधी मंजूर करून घेतला आहे. धायखिंडी ते करंजे हा रस्ता खराब झाल्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना दळणवळणासाठी अडचणी येत होती. सत्कारावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पोपट सरडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश सरडे, चंद्रशेखर सरडे, राजेंद्र शिंदे, अमोल थोरात, नामदेव सरडे, प्रशांत जाधव, नितीन पवळ, बबन ठोसर, संजय सरडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.