करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील जिंती मंडळात आज (शनिवारी) ‘महसूल सप्ताह’ निमित्त ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ हा उपक्रम साजरा करण्यात आला. या यामध्ये आजी- माजी सैनिक यांच्या घरी भेट देवून त्यांच्या प्रती देश सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यांच्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी कार्यालयात काही कामे असतील तर त्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सरकार आपल्या प्रती संवेदनशील असल्याचे मंडळ अधिकारी संतोष गोसावी यांनी सांगितले.
जिंती येथील तानाजी वारगड, नंदलाल भोसले, महादेव जानभरे, दादासाहेब भांगिरे यांच्या घरी भेट देवून त्यांना त्यांचा सातबारा व आठ अ सन्मानपूर्वक देण्यात आला. मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांनीही घरोघरी सर्व्हेच्या संबंधाने या माजी सैनिक यांची प्रत्यक्ष घरी भेट देवून नवीन नाव नोंदणी तसेच दुरूस्ती संबंधी चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही केली.
टाकळी (रा) येथील माजी सैनिक दिलीप भारत गुळवे व खातगाव नं 2 येथील तात्यासाहेब मोरे यांची भेट तलाठी रामेश्वर चंदेल यांनी घेवून त्यांच्या अडी-अडचणी समजावून घेतल्या. कोंढारचिंचोली येथील अरूण गोडगे व भरत गोडगे या देश सेवा करणा-या सख्या दोन भावांची भेट घेवून त्यांच्या जमिनीचे अभिलेख त्यांना सुपूर्द करण्यात आले. तलाठी जिंती प्रबुद्ध माने, तलाठी कोंढारचिंचोली सोमनाथ गोडसे, तलाठी टाकळी (रा) रामेश्वर चंदेल, तलाठी रामवाडी संजय शेटे, तलाठी हिंगणी राहुल बडकणे, जिंती मतदान केंद्र स्तरीय अधिकारी नीळकंठ शेळके, अविनाश नेवसे, जिंतीचे श्यामराव ओंभासे, कोंढारचिंचोली माजी सरपंच देविदास साळुंके, पुरूषोत्तम जाधव, कमाल मुलाणी यांचे सहकार्य लाभले.