करमाळा (सोलापूर) : गणेश विसर्जन मिरवणुकीत ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ साऊंड सिस्टीम सुरु ठेवल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल गणेश दळवी यांनी फिर्याद दिली आहे. अनंत चतुर्दशी दिवशी गणेश विसर्जन करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत साऊंड सिस्टीम सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र तरीही लोकमान्य टिळक मंडळाच्या गणेशोत्सवात १२ वाजल्यानंतरही साऊंड सिस्टीम सुरु होती. त्यामुळे साऊंड सिस्टीमचे चालक शेखर राजेश शिंदे (रा. चापडगाव, ता. कर्जत, जि. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
