सोलापूर : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलैच्या अर्हतावर आधारित छायाचित्र मतदार विशेष संक्षिप्‍त पुनरीक्षण कार्यक्रम (सुधारित- दुसरा) जाहीर केला आहे. त्यानुसार मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी 6 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल.

6 ते 20 ऑगस्ट या दरम्यान दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 29 ऑगस्टपर्यंत राहणार असून 30 ऑगस्टला मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्र सरकार, विधी व न्याय मंत्रालय यांचेद्वारा निवडणूक कायदा (सुधारणा) अधिनियत, 2021 अन्वये लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,1950 मध्ये सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार मतदान नोंदणी नियम, 1960 मध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार चार अर्हता दिनांक 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै व 1 ऑक्टोबर या अर्हता दिनांकावर वयाची 18 वर्षे पूर्ण करणारे व त्यावरील सर्व नागरिकांनी मतदार म्हणून नाव नोंदणी करावी .

सदर चार अर्हता दिनांकावर 18 वर्षे पुर्ण झालेल्या व त्यावरील सर्व नागरिकांनी www.voters.ecl.gov.in व voter helpline App (VHA) च्या माध्यमाने नांदणी करावा. मतदार यादीमध्ये आपले नांव आहे कि कसे हे शोधण्यासाठी www.electorasearch.eci.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. तसेच आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) किंवा दुरध्वनी क्रमांक 1950 यावरती संपर्क साधावा.

जिल्ह्यातील नागरीकांनी आगामी सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आपली नांवे, फोटो, पत्ता व इतर बाबी मतदार यादीमध्ये तपासून घ्यावीत. ज्यांची दुरूस्ती असतील त्यांनी दुरूस्ती करून घ्यावी व ज्यां नागरिकांची नांवे मतदार यादीमध्ये नाहीतच अशा सर्व नागरिकांनी ऑनलाईन, बीएलओ व मतदार नोंदणी कार्यालय या ठिकाणी जाऊन आपली नांवे मतदार यादीत नोंदवून घ्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *