करमाळा (सोलापूर) : किडनीचा त्रास असलेला रुग्णांना डायलिसिस हा महत्वाचा उपचार असून ग्रामीण भागात डायलेसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात डायलिसिस सेंटर उभा राहणे ही काळाची गरज आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार सावंत यांनी व्यक्त केले आहे. करमाळा येथील डॉ. खासदार श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटरला जिल्हाध्यक्ष केदार सावंत यांनी भेट दिली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य गणेश चिवटे, भाजपचे शंभूराजे जगताप, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, रामभाऊ ढाणे, शशिकांत पवार, नरेंद्र ठाकूर, चंद्रकांत राखुंडे उपस्थित होते. शिवसेना व भाजप या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी समन्वय ठेवून केंद्र व राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवाव्यात. सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सेना- भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढा उभा करावा व नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी एकत्र काम करावे, असे केदार सावंत यांनी सांगितले.