सोलापूर : पत्रकार हा थेट समाजात जाऊन प्रश्न व समस्या जाणून घेतात. विकासात पत्रकारांचे योगदान महत्त्वपूर्ण योगदान आहे. पत्रकारांच्या लेखणीत समाज परिर्तनाची ताकद आहे. असे सांगतानाच नव्या वर्षाच्या पूर्वदिनी पत्रकारांचा गौरव प्रेरणादायी आहे. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरोद्गार गुप्ता ट्रेडिंग कंपनीचे सीताराम गुप्ता यांनी काढले.
श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा रविवारी रिध्दी-सिध्दी हाँल, विनायक हाँटेल, बाळीवेस येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी विचारमंचावर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा महिती अधिकारी सुनील सोनटक्के, सोलापूर मध्य रेल्वे सोलापूर मंडळचे ट्रेन मँनेजर संजय कोळी, खंडेलवाल समाजचे अध्यक्ष शाम खंडेलवाल, उद्योजक संकेत थोबडे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते.
गुप्ता म्हणाले, पत्रकारांनी आपल्या पाल्यांना व जनतेला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न करावा. पत्रकारांना जनतेचे प्रश्न माहीत असतात. श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपत स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. त्यांचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. प्रास्ताविकात संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी यांनी गेल्या सात वर्षात राबविण्यात येत असलेल्या विद्यार्थी दत्तक योजना, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्काराने गौरव यासह विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.
सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले तर राजेश केकडे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केशव भैय्या, गणेश येळमेली, सुशांत वाघचवरे, मयुर गवते, शाम पाटील, अभिनंदन विभुते, दिपक करकी, बसवराज परचंडे, विजय जाधव, विक्रम बायस, सुरेश लकडे, साहेबराव परबत, शिवराज नगरकर, अभिजीत होनकळस, संतोष आलकुंटे, सादिक मनियार, अक्षता कासट, रुपा कुत्ताते, भारती जवळे, माधुरी चव्हाण, शुभांगी लचके, प्रियंका जाधव, संगीता पाटील आदींनी परिश्रम घेतले.
या पत्रकारांचा झाला पुरस्काराने सन्मान
महादेव आवारे (संचार), समाधान वाघमोडे (इन सोलापूर न्यूज), प्रकाश सनपूरकर (सकाळ), दीपक शेळके (सुराज्य), विजय साळवे (दिव्य मराठी), शीतलकुमार कांबळे (लोकमत), संदिप येरवडे (जनसत्य), प्रभूलिंग वारशेट्टी (तरूण भारत संवाद), मकरंद ढोबळे (स्वराज्य न्यूज) आदी पत्रकारांचा आदर्श पत्रकार पुरस्काराने गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह, सन्मान पत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे.