करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील घोटी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. या स्कुलमध्ये वैष्णवी दुधे या विद्यार्थीनीला 95.80 टक्के, किर्ती भोसलेला 93.80 टक्के, प्रियंका जाधवला 93.40 टक्के, सायली ननवरेला 92.60 टक्के, पूजा बदरला 88.20 टक्के गुण मिळाले आहेत. येथे 42 विद्यार्थ्यांनी परीक्षा. त्यात विशेष प्राविण्य मिळालेले १७ विद्यार्थी आहेत. प्रथम श्रेणीचे १७ विध्यार्थी आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे आमदार बबनदादा शिंदे, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे, संस्थेचे अध्यक्ष विक्रम शिंदे, सचिव पोपट खापरे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मोरे यांनी अभिनंदन केले.

