करमाळ्यातील समस्यांबाबत शहर विकास आघाडीच्या वतीने निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विविध समस्याबाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी सचिन तपसे यांना शहर विकास आघाडीने सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

यामध्ये म्हटले आहे की, ‘करमाळा शहरात अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना पाच- पाच दिवस पाणी भेटत नाही. करमाळा शहरातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते त्वरित बुजवण्यात यावेत. शहरातील गटारी भरल्या आहेत. कचरा साचलेला असून स्वच्छता करण्यात यावी तसेच आषाढी एकादशी पुर्वी शहरात जंतूनाशक फवारणी करण्यात यावी, आदी मागण्यासाठी शहर विकास आघाडीच्या वतीने निवेदन दिले आहे.

वेळेत मागण्या पूर्ण न केल्यास शहर विकास आघाडीच्या वतीने सोमवारी (ता. १६) नगरपालिकेसमोर घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. माजी नगरसेवक फारुक जमादार, माजी नगरसेवक रवींद्र कांबळे, माजी नगरसेवक गोविंद किरवे, माजी नगरसेवक दीपक सुपेकर, माजी नगरसेवक विजय देशपांडे, ओंकार चांदगुडे, विकास सोसायटीचे अध्यक्ष मनोज गोडसे, हुमरान मुलाणी, श्रीकांत ढवळे, गणेश अडसूळ यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *