रावगाव येथे वीज कोसळून विद्यार्थी ठार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील रावगाव येथे अंगावर वीज कोसळून एक विद्यार्थी ठार झाला आहे. संबंधित विद्यार्थी यावर्षी अकरावी उत्तीर्ण होऊन बारावीला जाणार होता. नुकताच त्यांच्या अकरावी परीक्षेचा निकाल झाला होता. त्याला पुढे शिक्षण घ्यायचे होते. मात्र त्यापूर्वीच त्याच्यावर काळाने घाला घातला आहे. या घटनेची माहिती समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे. जयदीप बापू पवार (वय १७) असे संबंधित विद्यार्थ्यांचे नाव असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. ठार झालेल्या तरुणाचा मृतदेह करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणला आहे.

जयदीप पवार हा घरासमोरील झाडाखाली उभा होता. आज (बुधवारी) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. झाड पडलेल्या झाडाला एक मोहळ होते. त्याच्या सर्व मधमाशा मरून पडल्या आहेत. जयदीप पवारच्या पश्चात आई, आजी- आजोबा व दोन बहिणी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *