करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी 2 हजार 613 जणांची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. यामध्ये सहकारी संस्था मतदार संघात 1469 मतदार आहेत. व्यापारी मतदार संघात 214 मतदार आहेत. हमाल व तोलार मतदारसंघात 123 मतदार आहेत. याशिवाय ग्रामपंचायत मतदार संघात 807 मतदार आहेत.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी ही यादी प्रसिद्ध केली आहे. यावर हरकती मागवण्यात आल्या आहेत. 7 ऑगस्टपर्यंत यावर हरकती नोंदवता येणार आहेत. त्यानंतर 21 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 18 संचलकासाठी ही निवडणूक घेतली जाणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *