करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ‘काय व कसे वाचावे’ या विषयावर साहित्यिक सुरेश शिंदे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील होते. साविंत्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कवी शिंदे म्हणाले, आधुनिक युगात सर्वांचे वाचन हे कमी झाले आहे. त्यात काय व कसे वाचावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी, प्रवास वर्णने ही आवश्य वाचली पाहिजेत. पुस्तके आपल्याला जीवन कसे जगावे याचा मूलमंत्र देऊन जातात. असे मत त्यांनी व्यक्त केले. प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील म्हणाले, ज्ञान ही जीवनामध्ये आवश्यक गोष्ट आहे. आपल्याजवळ असलेले संपत्ती एक वेळ संपून जाईल पण ज्ञान मात्र आपल्याला कायम समृद्ध करत राहील त्यामुळेच आपण वाचन केले पाहिजे.
या कार्यक्रमास विचारपीठावर मराठी विभाग प्रमुख प्रा. नितीन तळपाडे यासह प्रा. डॉ. सपनाराणी रामटेके, प्रा. डॉ. वंदना भाग्यवंत, प्रा. अभिमन्यू माने, प्रा. डॉ. विनायक खरटमल, प्रा. कृष्णा कांबळे व विष्णु शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिता बेरे, ज्ञानेश्वर कवाडे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक समाधान दामोदरे यांनी तर सूत्रसंचालन सायली निळ व आभार गायत्री येंगडे हिने मानले.