Sunanda Jadhav State Ideal Enabled Women Award

करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 च्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यांची अध्यापन कौशल्यपद्धती, शाळेला व विद्यार्थ्यांना लावलेल्या शिस्तीमुळे करमाळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा असा ठसा उमटवलेला आहे. नगरपालिकेची शाळा असूनही प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीकडे स्वतः लक्ष देणे, वेळोवेळी पालक मीटिंग घेऊन पालकांना मार्गदर्शन करणे तसेच शाळेची इमारत व परिसर वृक्षारोपण करून सुशोभित करणे यामुळे ही शाळा सर्वांची परिचित झाली आहे.

या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यांना राज्य सरकारने ‘राज्य आदर्श सक्षम’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. या अगोदरही जाधव यांना अनेक पुरस्कार मिळालेले असून त्यात या पुरस्काराने भर घातलेली आहे. या पुरस्कारासाठी राज्यभरातून अनेक महिला शिक्षकांची नावे होती. राज्यातून फक्त आठ महिलांची निवड या पुरस्कारासाठी झाली आहे. त्यात मुख्याध्यापका जाधव या एक आहेत.

या पुरस्काराबद्दल करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, बामसेफचे अरुण माने व मंडळ अधिकारी श्री. घुगे यांनी त्यांचा सत्कार केला. सुनंदा जाधव यांचा जीवन प्रवास हा नेहमीच आम्हाला प्रेरणादायी राहिला असून विद्यार्थ्यांना घडविणे करिता जाधव परिश्रम करीत आहेत. त्यांची शाळेबद्दल व विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल आस्था व तळमळ पाहून त्यांना सरकारने ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करायला पाहिजे होते, असे मत भोसले यांनी मांडले. या सन्मानाबद्दल नागेश दादा मित्र मंडळने अभिनंदन केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *