करमाळा (सोलापूर) : सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या वतीने माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना विविध मागण्या करत पाठींबा देण्यात आला आहे. करमाळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष युसुफ नालबंद व माजी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी, मौलाना मोहसीन, माजी नगरसेवक नजीर अहमद कुरेशी, माजी नगरसेवक अस्लम कुरेशी, मौलाना कादर, जामा मस्जिदचे विश्वस्त जमीर सय्यद, आझाद शेख, जहांगीर बेग, सादिक नालबंद, मुस्तकीम पठाण, कय्यूम शेख यांच्या उपस्थितीत शीतलदेवी मोहिते पाटील यांना पत्र देऊन हा पाठींबा देण्यात आला. यावेळी मोहिते पाटील यांनी मुस्लीम समाजाला विकासाच्या दृष्टीने इतर समाजातील घटकाबरोबर योग्य प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.


