करमाळा (सोलापूर) : पोथरे येथील शनी मंदीरात बुधवारी (ता. २२) पहाटे ५ वाजता संदीप पाटील प्रस्तुत ‘स्वरदीप दिवाळी पहाट’ कार्यक्रम होणार आहे. यामध्ये भक्तीगीत, भावगीत, चित्रपट गीतांची सुरेल मैफिल रंगणार आहे. पार्श्वगायक संदीप पाटील यांच्यासह गायक विद्या पाटील, निवेदक राजेश मंचरे, संगीत संयोजक अंबरीश जहागीरदार, वादक निलेश सोजवळ, तबलावादक ललित भूमकर व ढोलकी वादक अमित साळवे हे कला सादर करणार आहेत. यावेळी उपस्थित महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम होणार असून पाच विजेत्यांना बक्षीस दिले जाणार आहे.
तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक रणजित माने, यशकल्याणी संस्थेचे गणेश करे पाटील, प्रदिपशेठ बालदोटा आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत. परिसरातील नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.