Take action against shopkeepers who sell seeds at higher prices than the original price Rajabhau Kadam demand

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्याने बी बियाण्याची खरेदी शेतकरी करू लागले आहेत. याचा फायदा घेत दुकानदार बियाण्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने बी बियाणे विकून शेतकऱ्यांची लूट करत आहेत. ही शेतकऱ्यांची लूट त्वरित थांबवावी अशी मागणी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडे निवेदयाद्वारे केली आहे.

कदम यांनी म्हटले आहे की, मूळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अन्यथा बहुजन संघर्ष सेना तीव्र आंदोलन केले जाईल. बी बियाणे विक्री करणाऱ्या सर्व दुकानदारांची व कृषी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मूळ किमतीपेक्षा जादा दराने बी बियाणे विकू नये, अशी ताकीद देण्यात येईल व ज्यादा दराने विक्री करणाऱ्या बी बियाण्याच्या दुकानदारावरती कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे भरारी पथक नेमण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

भरारी पथकाला मूळ किमतीपेक्षा जादा दराने बियाणे विकताना दुकानदार सापडल्यास त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, बापू तळेकर, नामदेव पालवे, प्रहार संघटक सुनील बंडगर, किरण उलटे, श्रीकांत मारकड उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *