करमाळा (सोलापूर) : श्री गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तर शनिवारी (ता. १) गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद वाटप केले जाणार आहे, अशी माहिती स्पोर्ट्स क्लबचे प्रमुख माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे यांनी दिली आहे.
गजानन सोशल स्पोर्ट्स क्लब दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश जयंती आनंदात साजरी करणार आहे. यावर्षी होम हवन सहस्त्र आवर्तन गणेश यज्ञ करून सायंकाळी ६ ते १० या वेळेत महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिवजयंती व गणेश जयंती उत्सव दरवर्षीप्रमाणे उत्सहात साजरा केले जातात. क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषक १ लाखाचे तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक ७० हजाराचे तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक ५० हजार व चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक ३० हजाराचे असणार आहे. या स्पर्धा करमाळा येथील जीन मैदान येथे सुरु आहेत.