आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळ्यात होणाऱ्या पहिल्याच आमसभेची तारीख ठरली

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक झाल्यानंतरची करमाळा तालुक्याची आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या पहिल्या आमसभेची तारीख ठरली आहे. त्यासाठी नागरिकांना प्रश्न, निवेदने व सूचना करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांनी केले आहे. १७ मी पर्यंत पंचायत समितीच्या मेल आयडीवर आलेल्या सूचना, निवेदने व प्रश्नांचा स्वीकार केला जाणार असून शुक्रवारी (३० मे) ही आमसभा होणार आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

विधानसभा निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यावर आमसभा झाली नसल्याचा आरोप झाला होता. विरोधकांनी मुद्दा लावून धरला होता. निवडणूक झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी करमाळ्याची आमसभा कधी होणार? असा प्रश्न केला होता. त्यानंतर गटविकास अधिकारी डॉ. कदम यांनी या सभेची तारीख जाहीर केली आहे.

डॉ. कदम यांनी म्हटले आहे की, ‘२०२४ – २५ ची वार्षिक आमसभा शुक्रवारी (३० मे) आमदार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नालबंद मंगल कार्यालय येथे होणार आहे. karmalaaamsbha@gmail.com या मेलवर आयडीवर १७ मे पर्यंत आलेल्या सूचना, निवेदने व प्रश्नांचा स्वीकार केला जाणार आहे. या सभेत २०२४ – २५ मध्ये विकास कामाचा आढावा व २०२५ – २६ मध्ये करावयाच्या कामाचे नियोजन केले जाणार आहे. या सभेसाठी माजी सभापती, माजी उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, ग्रामसेवक, तलाठी. सर्व विभागप्रमुख व केंद्रप्रमुख यांनी वेळेवर राहण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *