The development of Karmala taluka has been stunted due to factional politics Ramdas Zol

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील गटातटाच्या राजकारणामुळे विकास खुंटला असून सर्वांगीण विकासासाठी मला एक वेळ आमदार म्हणून काम करण्याची संधी द्या, असे आवाहन अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ यांनी केले आहे.

बोरगाव येथील सभेमध्ये प्रा. झोळ बोलत होते. मंचावर शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, काँग्रेसचे हरिभाऊ मंगवडे, काँग्रेस ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष गफूर शेख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, दत्तकला शिक्षण सांस्थेच्या सचिव माया झोळ, गणेश मंगवडे, सुदर्शन शेळके, भगवान डोंबाळे, सुहास काळे पाटील, भिमराव ननवरे, यशवंतराव गायकवाड, श्रीकांत साखरे पाटील, मकाईचे माजी संचालक सुभाष शिंदे आदी उपस्थित होते.

प्रा. झोळ म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार, उद्योगनिर्मिती करणे हे माझे ध्येय आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे मराठा समाजातील मुलांना कुणबी दाखले मिळाले. हे दाखले मिळाल्यानंतर अनेकांना शिक्षणासाठी प्रवेश घेतला परंतु‌ जात पडताळणी मुदतीत असल्यामुळे अनेकांचे प्रवेश रखडले होते. आपण ही बाब सरकारच्या लक्षात आणून देऊन ६ महिने मुदत वाढवून घेतली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला. बोरगावमध्ये प्रा. झोळ यांचे ग्रामस्थांच्या वतीने हलगी नाद करून जल्लोषात स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत साखरे पाटील यांनी तर सूत्रसंचालन प्रा. नवले यांनी केले. आभार गोडगे यांनी मानले.

करमाळा तालुक्यामध्ये विकासाच्या नावाखाली प्रस्थापित नेते मंडळींनी भुलथापा मारुन दिशाभूल करण्याचे काम केले आहे. विकास नुसता कागदावरच झाला आहे. करमाळा तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी ‌सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून भिगवण सारख्या ठिकाणी शैक्षणिक संस्था उभा करून आपले कर्तुत्वसिद्ध केलेल्या प्रा. झोळ यांना निवडून द्या, असे आवाहन कांबळे यांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *