केडगाव येथील तरुणाच्या मृत्यूची चौकशी करण्याची कुटुंबीयांची मागणी

The family demands an inquiry into the death of a young man from Kedgaon

करमाळा (अशोक मुरुमकर) : ‘केडगाव येथील अरबाज महंमद पठाण यांचा घातपाती मृत्यू असल्याचा संशय असून पोलिसांनी याची संपुर्ण चौकशी करावी’, या मागणीसाठी कुटुंबीयांनी करमाळा तहसील कार्यालय येथे मूक मोर्चाने येत मंगळवारी (ता. २७) उपोषण केले. उपोषण कर्त्यांचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक पोपट टिळेकर व श्री. चंदनशिवे यांनी स्वीकारले. या आंदोलनात महिलांचा मोठा सहभाग होता.

केडगाव येथील अरबाज पठाण यांचा १४ मे रोजी मध्यरात्री मृत्यू झाला आहे. हा मृत्यू अपघाती नसून घातपाती असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कोंडेज चौकात पठाणचा मृतदेह आढळून आला होता. हा अपघात असल्याचे सांगितले जात होते. मात्र कुटुंबीयांनी हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करून सर्व सीसीटीव्ही तपासून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *