करमाळा (अशोक मुरूमकर) : शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्याची आता अंमलबजावणीही सुरु झाली आहे. यातूनच करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी सर्व ग्रामसेवकांना लेखी आदेश दिला आहे. त्यामुळे १ मे २०२४ नंतर जन्माला असलेल्या सर्व बालकांची नोंद आईच्या नावासह होणार आहे.
गटविकास अधिकारी राऊत यांनी म्हटले आहे की, आंतरविभागीय समन्वय समितीच्या बैठकीत आईचे नाव लावण्याबाबत चर्चा झाली. सरकारच्या निर्णयानुसार आईच्या नावाचा समावेश केला जाणार आहे. जन्म- मृत्यू नोंदवहीत (जन्म अहवाल) तीन रकाने देण्यात आले आहेत. पहिल्यांदा बाळाचे नाव (प्रथम), वडिंलाचें नाव (मधले नाव) व आडनाव (शेवटचे नाव) यामध्ये आता ज्या रकान्यात वडिलांचे नाव समाविष्ट आहे करण्यात आले आहे. त्यापूर्वी त्याच रकान्यात आईचे स्पेस देऊन वडिलांचे नाव समाविष्ट करावे. त्यानुसार प्रमाणपत्र वितरित करावे.
बाळाचे नाव समावेश करण्यासाठी आई- वडील यांचा लिखित स्वरूपात अर्ज घेण्यात यावा. हा अर्ज नोंदणीचा भाग म्हणून कायमस्वरुपी जतन करावा. याबरोबर बाळाचे नाव एकदा समाविष्ट झाल्यानंतर ते बदलता येणार नाही हे देखील अर्जदारास सांगण्यात यावे. जन्म- मृत्यू नोंदणी अधिनियम व नियमातील कायदेशीर तरतुदीनुसार निंबंधक जन्म- मृत्यू यांनी आपल्या कार्यकाळातील सर्व जन्म- मृत्यू नोंदी कालावधीत कराव्यात, यासाठी सरकारच्या संकेतस्थळाचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.