करमाळा (सोलापूर) : केम- ढवळस हा जिल्हा प्रमुख मार्ग क्रं 14 रेल्वे लाइन कि.मी क्र. 359/26 – 359/28 या मार्गांवर रेल्वे लाईन असल्यामुळे केमच्या रेल्वे लाईन पलिकडे छोटी- मोठी आठ गावे असून केम- ढवळस व इतर गावांना जोडण्यासाठी कोणताही रस्ता नसल्यामुळे येथील लोकवस्ती अनेक गावातील लोकांना व आजूबाजूला असणाऱ्या अनेक गावातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे.
रेल्वे मार्गाच्या अलीकडील व पलीकडील गावातील लोकांना पाऊस पडल्यावर येण्या- जाण्यासाठी अडथळा निर्माण होऊन सदर गावातील लोकांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना रेल्वे लाईन ओलांडून येणे जाणे करावे लागते त्यामुळे त्याच्या जीवास धोका निर्माण होऊ शकतो. या कारणास्तव रेल्वे प्रशासन यावर लक्ष घालून लोकांच्या सेवेसाठी केम ढवळस जिल्हा प्रमुखमधून RUB भुयारी मार्ग रेल्वे प्रशासनाने बनवून द्यावे, अशी मागणी माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर रेल्वे प्रशासन IWD प्रमुख आधिकारी प्रसाद जोशी व सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा- कुडूवाडी लोकरे यांनी मिळून सर्वे करून प्रस्ताव रेल्वे विभाग सोलापूर यांच्याकडे पाठवून दिला व सोलापूर मंडल रेल्वे प्रबंधक डॉ. सुजित मिश्रा व ताजऊदीन यांच्याकडून केम- ढवळस रेल्वे मार्गावरील भुयारी मार्गाला तीन ते चार महिन्यांमध्ये मंजुरी मिळून काम लवकर सुरु होणार आहे, अशी माहिती दिली.
सकाळी दौंड व सोलापूर येथे शेतकरी, शालेय विद्यार्थी व कर्मचारी लोकांना येण्या- जाण्यासाठी लवकरच शटल सुरु होईल, असेही आश्वासन देण्यात आले. त्यामुळे केममध्ये आनंद व्यक्त होत आहे. याचा पाठपुरावा प्रहार संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर हे करत आहेत.