प्रा. झोळ यांची गांधीगिरी! नादुरुस्त बसमुळे चर्चेत आलेल्या करमाळा एसटी स्टँडची मंगळवारी केली जाणार स्वच्छता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा बस स्थानक ‘सैराट’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रसिद्धीला आले. मात्र आता हेच बस स्थानक दुरावस्थेमुळे चर्चेत आले आहे. या बस स्थानकाची प्रा. रामदास झोळ यांनी पहाणी केली आहे. येथील एसटी बसची अवस्था पत्रकार विशाल घोलप यांनी समोर आणली आहे. ते देखील यावेळी उपस्थित होते.

करमाळा बस स्थानकाचा परिसर अस्वच्छ आहे. याची पहाणी प्रा. झोळ यांच्यासह शहाजी माने, पत्रकार घोलप यांनी केली. त्यावर प्रा. झोळ यांनी मंगळवारी प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून बस स्थानकाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवणार असल्याचे जाहीर केले आहे. परिसर स्वच्छ करून देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. यावेळी तालुक्यातील सामाजिक कार्याची आवड असलेल्या नागरिकांना यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *