करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करून जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर करमाळा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीच्या आठ जागेंवर मोहिते पाटील समर्थक शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरेल आहेत. मोहिते पाटील समर्थक म्हणून ओळख असलेले अजित तळेकर हे मात्र आमदार पाटील यांच्या गटाबरोबर गेले आहेत. तर कोर्टी गटातून सवितादेवी राजेभोसले या ‘तुतारी’ या चिन्हांवरच असणार आहेत. ऐनवेळी शिंदे समर्थक ऍड. नितिनराजे भोसले यांच्या पत्नी योगिनी राजेभोसले यांनी पाटील गटात प्रवेश केला आहे.
पांडे गटातून संतोष वारे यांच्या पत्नी राणी वारे, रावगाव गणातून दीपाली कांबळे व पांडे गणातून शिवाजी जाधव, वीट गटातून ऋतुजा शिंदे, हिसरे गणातून कृती लावंड, केम गणातून अमरजीत साळुंके, चिखलठाण गणातून कोमल झोळ, राधिका चव्हाण, कोर्टी गटात सावितराजे राजेभोसले, कोर्टी गणातून अमोल दुरंदे व
केत्तूर गणातून सुहास गलांडे यांचे अर्ज आहेत.
