करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) इच्छुक असलेले उमेदवार मंगळवारी (ता. २०) माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. सकाळी ११ वाजता कमलाभवानी मंदिर येथे सर्व गण व गटातील उमेदवार व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आई कमलाभवानीचे दर्शन घेऊन भव्य रॅलीने हे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी तहसील कार्यालय येथे जाणार आहेत.
कोर्टी गट व गणातील कार्यकर्ते सकाळी ९:३० वाजता टाकळी चौक येथून श्रीदेवीचामाळ येथे येणार आहेत. त्यानंतर माजी आमदार शिंदे यांच्या समवेत तहसील कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणार आहेत. फिसरे गणातीलही कार्यकर्ते यावेळी येणार आहेत. पार्किंगची व्यवस्था यशवंतराव चव्हाण महाविद्याल येथे करण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
