करमाळा (सोलापूर) : तालुक्याच्या पुर्व भागाचा विकास करण्यासाठी उजनीतील पाण्यावर करमाळा तालुक्याने आपली बाजू मांडण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले आहे. निंभोरे येथे ‘जनसंवाद’ दौऱ्यात ते बोलत होते.
माजी आमदार पाटील यांनी निंभोरे येथून आज (रविवारी) जनसंवाद गावभेट दौऱ्याला सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) धैर्यशील मोहिते पाटील यांनी विजयी मिळवला आहे. त्यामुळे पाटील गटामध्ये उत्सहाचे वातावरण आहे. माजी आमदार पाटील यांचा यावेळी ग्रामस्थांनी सत्कार केला.
माजी आमदार पाटील म्हणाले, दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून पुर्व भागाला चांगले दिवस येणार आहेत. २०१४ मध्ये आमदार म्हणून काम करताना २० वर्षे रखडलेली ही योजना आपण मार्गी लावली. येणाऱ्या काळात उजनीच्या पाण्याचा जास्तीत जास्त लाभ करमाळा तालुक्याला मिळावा म्हणून आपण प्रयत्न करणार आहे. पुर्व भागाच्या शेतीसाठी पाणी हा अतिशय महत्वाचा विषय आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन नाना जगताप यांनी केले. करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, प्रा. अर्जूनराव सरक, भारत सांगडे, जवाहर लुणावत, पंडीत वळेकर, नितीन लांडगे, अविनाश वाघमारे, दिनेश वाघमारे, भारत अडसुळ, पंजाब गाडे, राज पठाण, भीमराव मारकड, बाळासाहेब वळेकर, सतीश जाधव, भानुदास जाधव, सचीन वळेकर, भालचंद्र वळेकर, गणेश वळेकर, भाऊ वाघमारे, कैलास काकडे, बिभीषण फरतडे, सुभाष फडतरे, राजेंद्र वळेकर आदी उपस्थित होते.