विक्रमसिंह शिंदे यांचा अंतरवाली सराटी येथे जाऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा

करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी रविवारी (ता. ९) भेट देऊन पाठिंबा दिला आहे.

मराठा समाज बांधवांना ओबीसीमध्ये कुणबी मराठा सगळे सोयरे या शब्दाचा अंतर्भाव करून लाभ मिळण्यासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मराठा समाज आरक्षणाचे जनक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास सभापती विक्रमसिंह शिंदे यांनी भेट देऊन मराठा आरक्षणास माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने जाहीर पाठिंबाचे पत्र दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय मोरे, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सचिन देशमुख, पंचायत समितीचे उपसभापती धनाजी जवळगे, युवक नेते अमोल नलवडे, पत्रकार राजेंद्र केदार, सचिन डोके, नागेश जगताप उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *