शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची दुसरी उमेदवारी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. यामध्ये माढा व साताऱ्याची नावे नसल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे. यामध्ये बीड मतदारसंघातून बजरंग सोनवणे व भिवंडीतून सुरेश उर्फ बाळयामामा म्हेत्रे यांची नावे जाहीर झाली आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही ही यादी जाहीर केली आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पहिल्या यादीत वर्ध्यात अमर काळे, दिंडोरीत भास्कर भगरे, बारामतीत सुप्रिया सुळे, नगरमधून निलेश लंके व शिरूरमधून डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवार म्हणून नावे जाहीर केली होती. दुसऱ्या यादीत माढा व सातारा मतदार संघाची नावे जाहीर होतील, अशी शक्यता होती. मात्र या यादीत नावे जाहीर झाली नसल्याने पुन्हा उत्सुकता वाढली आहे. तिसऱ्या यादीत माढ्यातून मोहिते पाटील यांचे नाव जाहीर होणार का? दुसरेच कोणी येणार हे पहावे लागणार आहे. बीड मतदारसंघातून ज्योती मेटे यांचे नाव समोर येत होते मात्र तेथे भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याविरुद्ध सोननवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.