करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शनिवारी (ता. २३) सकाळी 8 वाजता ईव्हीएम मशीनवर मतमोजणी सुरु होणार आहे. 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये मोजणी होणार असून यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे. मतमोजणीसाठी साधारण ११६ कर्मचारी नियुक्त केले असून टपाल मतमोजणी 12 टेबलवर 8 फेऱ्यांमध्ये होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात १५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यात संजयमामा शिंदे व नारायण पाटील यांच्यात प्रमुख लढत मानली जात असून दिग्विजय बागल व प्रा. रामदास झोळ मत घेतील यावर विजयाचे गणित असल्याचे बोलले जात आहे. माढा तालुक्यातील ३६ व करमाळा तालुक्यातील ११८ गावे आहेत. या मतदारसंघात ३ लाख २८ हजार ८८४ मतदान आहे. त्यापैकी २ लाख २९ हजार ३७५ मतदान झाले होते. त्यात करमाळा तालुक्यात 1 लाख 62 हजार 783 माढा तालुक्यातील ३६ गावात 67 हजार 192 मतदान झाले होते. या मतदारसंघात ३४७ मतदान केंद्र होते.
मतदान यंत्रणा व्यवस्थित व्हावी म्हणून प्रशासनाने नियोजन केले आहे. एका फेरीला साधारण अर्धा तास लागणार आहे. १७ फेऱ्यापर्यंत करमाळा तालुक्यातील गावे आहेत. त्यानंतर १८ व्या फेरीपासून माढा तालुक्यातील गावांची मतमोजणी सुरु होणार आहे.
अशी असणार मतमोजणी