Taluka level English elocution competition will be held in Karmala on Thursday

करमाळा (सोलापूर) : विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांच्या व्यावहारिक जीवनातआत्मविश्वासाने इंग्रजी बोलण्याचे धाडस निर्माण व्हावे म्हणून यशकल्याणी सेवाभवन व गिरधरदास देवी विद्यालय येथे लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ गुरुवारी (ता. २७) तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. यशकत्याणी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग करमाळा पंचायत समिती व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने ही स्पर्धा होणार आहे.

या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून माढा, परांडा, कर्जत व बार्शी येथील शिक्षक काम पाहणार आहेत. तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेतली जाणार आहे. पहिला ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. स्पर्धेचे बक्षीस वितरण त्याच दिवशी यशकल्याणी सेवाभवन येथे प्रा. गणेश करे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *