करमाळा (सोलापूर) : उजनी काठावरील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याच्या मागणीसाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
वीजपुरवठा कमी करून शेतकऱ्यांवर अन्याय होत असून जलाशयातील पाणी कितीसे कमी होते हे आकडेवारीसह समितीने स्पष्ट केले. 65 गावातील लाखो एकर शेतीतील उभ्या पिकाचे नुकसान होऊन शेतकरी कसा उद्ध्वस्त होणार हे यावेळी सांगण्यात आले. धरणग्रस्तांच्या हक्काचे 12 टीएमसी पाणी उचलताना वीज कपात करणे कसे अन्यायकारक हे ही यावेळी सांगण्यात आले. नियोजनाच्या अभावाचा शेतकऱ्यांना फटका बसूल लागला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी बंडगर, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, गौतम मोरे, पंडीत रणदिवे, बाबासाहेब चौगुले यावेळी उपस्थित होते.