करमाळा (सोलापूर) : देव, देश, धर्म, ऐतिहासिक याबरोबर सर्वधर्म समभावाचा वसा जपत समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांचे कार्य कौतुकास्पद आहे, असे करमाळ्याचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ यांनी गणेशोत्सवानिमित्त आरस म्हणून ऐतिहासिक ‘हिरकणीचे शोर्य’ हा देखावा सादर केला.
देखाव्याच्या उद्घाटनावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, आदिनाथचे संचालक डॉ. हरिदास केवारे, ॲड. बाबुराव हिरडे, भोजराज सुरवसे, भाऊसाहेब काळे, धनंजय शिंदे, दौलत वाघमोडे, वालचंद्र रोडगे, गजानन गावडे, फारूख जमादार, विलास दळवी, विजय दोशी, उत्कर्ष गांधी, अशोक दोशी, पिंटू शेठ कटारिया, प्रदीप लुणिया, मार्तंड सुरवसे, अध्यक्ष साहिल रोडे, उपाध्यक्ष शाबीर शेख, अक्षय बनकर अल्लाउद्दिन शेख, आदित्य देशमाने, ओंकार सावंत, रवींद्र सुरवसे, योगेश काकडे, सुजित शेळके, महेश अंधारे, लखन उबाळे, अनिल माने, हुमरान मुलाणी आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी पुढे बोलताना माने म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ हे खऱ्या अर्थाने सामाजिक, धार्मिक तसेच सामाजिक समरसता जपणारे मंडळ असून या मंडळाची ऐतिहासिक परंपरा असून 78 वर्षाची यशस्वी परंपरा असल्याचे त्यांनी सांगितले. इतर ठिकाणी गणेश मंडळाला डॉल्बी लावू नका असे सांगावे लागते परंतु छत्रपती शिवाजी तरुण मंडळ यांनी अद्याप पर्यंत डॉल्बी न लावता पारंपरिक वाद्य वाजून मिरवणूक काढली आहे खऱ्या अर्थाने हे मंडळ एक आदर्श मंडळ असून या मंडळाचा आदर्श घेणे काळाची गरज असल्याचे रणजीत माने साहेब यांनी सांगितले.: यावेळी मनोगत व्यक्त करताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी छत्रपती शिवाजी तरुण मंडळाच्या कार्याचा लेखाजोखा सर्वांसमोर मांडला. गणेशोत्सवा बरोबरच या मंडळाचे वतीने रक्तदान शिबिर सर्व रोग निदान शिबिर अशा पद्धतीचे समाज उपयोगी उपक्रम राबवत असून या मंडळामध्ये सर्व जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले हे मंडळ एक कुटुंब असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले मिरवणुकीमध्ये सुद्धा पोलिसांना कुठलाही प्रकारचा त्रास न होता आम्ही आमची मिरवणूक पोलीस बंदोबस्त शिवाय यशस्वीपणे काढू शकतो अशी आमची शिस्तप्रिय मंडळ असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आदिनाथ कारखान्याचे संचालक ॲड .राहुल सावंत म्हणाले की, आमचे आजोबा कै. अनंतराव ( आबा ) सावंत यांनी स्थापन केलेल्या या मंडळाचे काम यशस्वीपणे चालू असून कै. सुभाष ( आण्णा ) सावंत यांनी दिलेल्या शिकवणीनुसार तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक विठ्ठल आप्पा सावंत, गोपाळ बापू सावंत,भगवान नाना सावंत, दादा सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समाज कल्याणकारी उपक्रम राबवून सामाजिक सलोखा जपण्याचे काम आम्ही करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ॲड .बाबुराव हिरडे, पीआय रणजित माने, सुनील बापू सावंत, डॉ.गजानन गुंजकर, ॲड. राहुल सावंत यांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत नगरसेवक संजय उर्फ पप्पू सावंत यांनी केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन संजय खारगे गुरूजी यांनी केले तर आभार ॲड राहुल सावंत यांनी मानले.