करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील शेटफळ येथील जिव्हाळा ग्रुपच्या वतीने दिपावलीनिमित्त किल्ले बांधणी स्पर्धेचे बक्षीस वितरण व गावातील गरजुंना जेवण डबे पुरविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ झाला आहे. यावेळी गुणवंतांचा सन्मानही झाला. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व ग्रामसधार समीतीचे अध्यक्ष ॲंड. डॉ. बाबूराव हिरडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आहे.
प्रभारी तहसीलदार जाधव म्हणाले, ‘माणुसकी हरवत चाललेल्या युगात सामाजिक बांधिलकी जपत जिव्हाळा ग्रुपचे कार्य प्रेरणादायी आहे.’ ॲड. डॉ. हिरडे म्हणाले, ‘शेटफळने सामाजिक, धार्मिक, कृषी व सांस्कृतिक क्षेत्रात आदर्श निर्माण केला आहे. शेतकरी गटापासून ते लोकविकास फार्मर्स प्रोडूसर कंपनीपर्यंत त्यांचे कार्य आहे. व्यसनमुक्ती व ग्राहक पंचायतचे कामही येथे केले जात आहे. त्यांच्या उन्नतीसाठी जे उपक्रम राबवले जातात हे उपक्रम निश्चितच इतरांसाठी आदर्शात्मक आहेत.’
हभप विठ्ठल महाराज पाटील, संध्याराणी लबडे, पुजा लबडे, दिपाली चिंचकर, पोलिस उपनिरीक्षक अमित लबडे यांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक प्रा. सचिन धेंडे यांनी केले तर आभार पोलिस हावलदार नवनाथ नाईकनवरे यांनी मानले. सुत्रसंचलन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले.माजी सरपंच मुरलीधर पोळ, वैभव पोळ, साहेबराव पोळ, सुभाषराव लबडे, विजय लबडे, सचिन निंबाळकर, अशोक लबडे, कैलास लबडे, श्रीराम गुंड, विलास लबडे, संतोष घोगरे, महावीर निंबाळकर, महेश नाईकनवरे, प्रशांत नाईकनवरे, नानासाहेब साळुंके, सागर पोळ, विष्णू पोळ आदी उपस्थित होते.